Type Here to Get Search Results !

Revenue Forms Information

Revenue Forms Study:

1. Gaon Namuna 1A - 

Van Jaminichie Register. 

2. Gaon Namuna 1B - 

Bin -Bhogavtyachya {Pad-Jamini} (Sarkari)  Jaminiche Register 

3. Gaon Namuna 1k - 

Bhogavta Varga 2 or Dharan Padhat 2 or Dharan Prakar 2 {Ceiling Act}

To purchase such land prior permission of state Govt is needed & 40 times Najrana is to be paid on Shetsara amount. 

4. Gaon Namuna  1D - 

Kul Vahivat Kayda 1948 & ULC Act 1961/4 

A. 12 months water supply - 18 Acres 

B. Ltd resources of water supply - 36 Acres 

C. Dry Land - 54 Acres 

5. Gaon Namuna 1E -

 Encroachment Register 

6. Gaon Namuna 2 

For NA Revenue Register 

7. Gaon Namuna 3

Dumala Jaminiche Register or Vatan Register For Eenam Varga 

There are various Eenams from 1to7 But Maha  here r 1,3 & 7 Eenams 

1) Suranjam 

2) Devsthan 

3) Schl /College,  Hospitals. 

8. Gaon Namuna. 6

 PherPhar also knw as Haakk Naundh Patre or D Patrak. 

9. Gaon Namuna 6 A 

Vivadgrast Prakarnache Register 

10. Gaon Namuna 6 B

Late fee form Within 3 months he has to intimate talathi abt the purchase of land if not late fee Rs.5/- n fill the form. 

11. Gaon Namuna 6 K

Varus Prakarnache Register (after this their names r mutated on 7/12 extract). 

12. Gaon Namuna 6 D

New Sub Division (pot Hissa) Register 

13. 7/12 extract 

 Form 7 - hakka (Adhikar)  Patrak 

 Form 12 - pik pani Patrak 

 Form 7 A - Kul Vahivat info 

BhogavtaDar/ Khalsa -

Varga 1 - Land came through heirs 

Varga 2 - Land provided by govt to landless peoples Or less landholder. 

Varga 3 - Govt give on leasehold,  on condition, for Ltd period (mostly those land belong to Eenam or Vatan lands)

* Sankirna means revenue redemptioned land. 

* Devsthan Eenam Varga 3 Chya land Vahivatdarkchih nave lagtat & not others. 

Pot Kharaba :

Varga -A: Bandh,  nalala, khadak,  kanani etc 

Varga - B: Rd., kalwe,  talaw etc.

Ektar Harkat: 

1. Tukde badli remark asel tar land madhla ekhada part vikta or vikat gheta yet nahi. 

2. Punarvasanasathi sampadhit remark asel tar Govt has acquired the land for rd etc.

3. Kulkayda sec. 43 remark then prior permission of Dist. collector. 

Kulkayda Amended 01.04 1957 enactment it is also call as krushi din. U/s. 32G. Tenant apply for ownership of land against landowners 

* Kul means dusrayacha malki Chay zamin kahi khand deuun legally kasnara person. 

4. Ku. Ka.K. 84 K - sathi patr :

This remak means to purchase such land you need to be farmer.if not get permission from District Collector. 

If a non farmer person purchase a agri.land vtout DC permission then

The Ku. Ka. K 84 K remak is noted & even govt Can confiscate the said land. Their is restrictions on transactions of such land also. 

If any land is not tilled for continuous 12 years then Kulkayda Chya niyam lagu hott nahi. In such case such above mentioned remak is removed. 

Aadivasi land cannot be purchased u/s. 36, 36A & 36 B. Aasya land vtout DC permission hastantaran karta yet nahi. 

*u/s 327 of MLRC 1966 Peoples have Righttto get copy of revenue docs.


१ हेक्टर = १०००० चौ. मी . 

१ एकर = ४० गुंठे 

१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट  [ It was Earlier Now its 1 गुंठा = 1076.39 ]

१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे

१ आर = १ गुंठा 

१ हेक्टर = १०० आर

१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट

१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट

७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!

नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!

जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!

ग्रामपंचायत

एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. 

आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.

* गाव नमुना नंबर - 1 - 

या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.

* गाव नमुना नंबर - 1अ - 

या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.

* गाव नमुना नंबर - 1ब - 

या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 1क - 

या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.

* गाव नमुना नंबर - 1ड - 

या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 1इ - 

या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 2 - 

या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 3 -

 या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.

* गाव नमुना नंबर - 4 - 

या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 5 - 

या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 6 - 

(हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 6अ - 

या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 6क -

 या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 6ड - 

या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 7 - 

(7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा,आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 7अ - 

या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 8अ - 

या नोंद वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 8ब, क व ड -

 या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 9अ - 

या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 10 - 

या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 11 - 

या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 12 व 15 - 

या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 13 - 

या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 14 - 

या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 16 -

 या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 17 - 

या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 18 -

 या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.

* गाव नमुना नंबर - 19 -

या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 20 - 

पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.

* गाव नमुना नंबर - 21 - 

या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.
Tags